किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील, Indurikar Maharaj पुन्हा वादात

किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील, Indurikar Maharaj पुन्हा वादात

| Updated on: Mar 08, 2022 | 10:08 AM

वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कीर्तनाच्या व्हिडीओ क्लीप तयार करुन यूट्यूबवर (YouTube) अपलोड करणाऱ्या तरुणांवर इंदुरीकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला. “माझ्या जीवावर 4 हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल” असं म्हणत दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे इंदुरीकरांनी केले. सोमवारी रात्री अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांचं कीर्तन झालं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं.