उदय सामंत यांनी सांगितली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची खासियत, काय म्हणाले बघा
VIDEO | जनतेत जाऊन काम करण्यची सवय मागच्या सरकारमधील लोकांना नसल्यानं ते शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतायत, उदय सामंत यांनी सुनावलं
जळगाव : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताय, यावरून विरोधकांकडून टीका होत असून न्यायालयातील सत्तासंघर्षावरून काही प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे, म्हणून ते इतके दौरे करताय अशी टीका विरोधक करत आहेत, यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी विरोधकांना चांगलेच प्रतुत्तर दिले आहे. ते म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री जनसामान्यांत जातात, त्यावेळी तो जनतेचा मुख्यमंत्री असतो. एकनाथ शिंदे हे मुंबईत बसून देखील राजकारण आणि विकासकामं करू शकले असते, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची खासियत अशी आहे की ते दोघंही लोकांमध्ये जाऊन काम करतात आणि लोकांध्ये जाऊन काम करण्यची सवय मागच्या सरकारमधील लोकांना नसल्यामुळे ते टीका करतायत. मुख्यमंत्री किंवा आम्हाला कसलंय टेन्शन नाही. आम्ही योग्य ती कागदपत्रं दिली आहेत, आमचा कोर्टावर विश्वास आहे. मात्र ज्यांना भिती आहे ते पाच बेंचकडून सात बेंचकडे जावं अशी मागणी करतायत, असे म्हणत त्यांनी खोचक टीकाही विरोधकांवर केली आहे.