शिवसेनेच्या जाहिरातीवर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणताय…
VIDEO | 'शिंदे-फडणवीसांच्या कामाची जनतेने नोंद घेतली, त्यामुळे...', शिवसेनेच्या जाहिरातीवर उदय सामंत यांचं भाष्य
कोल्हापूर : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून काही वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या वृत्तपत्रातील जाहिरातीतून एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळाल्याचे दावा केला जात आहे. शिवसेनेच्या जाहिरातीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. “देशात मोदींच्या नेतृत्वात विकासात्मक काय बदल घडले हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच ठरवलं असावं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी सांघिकपणे काम करतायत. गेल्या दहा महिन्यात दोघांनी केलेल्या कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने घेतली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचा हा विजय आहे. या सर्वेमुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आणि सर्वेमध्ये नंबर वन आम्ही आलो तो नंबर टिकवणं ही देखील जबाबदारी आमची आहे. शिवसेना-भाजप युतीचे हे सांघिक यश आहे” असं रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. “संकल्पना बदलण्यापेक्षा सरकार कसं चालतं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्रजी हे युतीमध्ये आमचे नेतेच आहेत. पाच वर्षे त्यांनी सक्षमपणे महाराष्ट्र चालवलाय. मागच्या अडीच वर्षात सगळीकडे स्पीड ब्रेकर होते” अशा शब्दात उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.