उद्योगमंत्री उद्य सामंत यांचे धक्कादायक विधान, ‘५० हजार कोटींचा तो एमओयु सापडत नाही’
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन तीन मंत्री डावोस येथे गेले होते. आता मुख्य्म्नात्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून विरोधक टीका करत आहेत. मात्र, त्यावेळी त्या मंत्र्याचा खर्च कुणी हे देखील सांगावे.
मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | मी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहे असा संभ्रम जनतेमध्ये पसरविण्यात आला. पण, मी काही दौऱ्यावर गेलो नाही. मी तुमच्यासमोर आहे. पण, ज्यांनी हा संभ्रम पसरविला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करणे सुरू आहे राजकारणाचा स्तर घसरत आहे. आरोप करताना पुरावे दिले पाहिजे. प्रत्येकाला बोलता येते. पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली पाहीजे, असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगावला. ठाकरे सरकारच्या काळात उद्योगमंत्री यांनी जपानचा दौरा केला. सुभाष देसाई, नितीन राऊत, आदित्य ठाकरे यांचा डावोस येथील खर्च कोणी केला? प्रधान सचिव आशिष सिंग याचा खर्च कोणी केला? सुभाष देसाई यांचे पीएस यांचा खर्च कोणी केला याची उत्तरे त्यांनी द्यावीत. डावोस येथे ५० हजार कोटीचा एमओयु केला असे विरोधक सांगत आहेत. पण, उर्जा खात्याचा तो एमओयु अद्याप कुठेच सापडत नाही असे धक्कादायक विधान त्यांनी केले.