‘ही’ खेळी शिंदे सरकारवरच बुमरँग? RTI तून मिळालेल्या माहितीवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया पाहा Video
माहिती अधिकाराअंतर्गत उघड झालेली माहिती सरकारलाच तोंडावर पाडणारी आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबईः माहिती अधिकाकाराअंतर्गत (RTI)वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पाविषय़ी मागवलेली माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच तोंडावर पाडणारी आहे. सरकारने माहिती देताना महाविकास आघाडी सरकारने काय काय केलंय, हेही दिलेलं आहे, त्यामुळे ही उत्तरं शिंदे सरकारनेच एकदा पहावीत असा टोमणा शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी लगावला आहे.
संतोष गावडे नावाच्या मुलाने 31ऑक्टोबर रोजी पत्र लिहिलं आणि त्याच दिवशी उत्तर मिळालं. जसं काही ड्राफ्ट रेडी होता फक्त कुणाचं तरी पत्र येण्याची वाट पहात होते. जसं की तिकडं तिकिट मागे घ्यायचं होतं… असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलंय.
अंधेरी पोटनिवडणुकीत राज ठाकरेंना पत्र लिहिण्याची विनंती करण्यात आली त्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या विनंतीला मान देऊन निवडणुकीतून माघार घेतली, असा आरोप शिवसेनेने केलाय. त्याच संदर्भाने अरविंद सावंतांनी या माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या या माहितीवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गेला, याचा तपास घेण्यासाठी सदर कार्यकर्त्याने माहिती मागवल्याचे दाखवले जात आहे. मात्र सरकारने दिलेली ही माहिती पोलखोल करणारी आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली.
आदित्य ठाकरे यांनी काल टाइमलाइन देऊन चर्चा करण्यासाठी समोर या म्हटलंय, त्यामुळे सरकार घाबरलंय, असा आरोप अरविंद सावंतांनी केलाय. ५ मे २०२२ रोजी वेदांताने स्वारस्य अभिव्यक्ती केली होती. 14 मे 2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे गुंतवणुकीबाबत अर्ज सादर केला होता, मग काहीच झालं नाही कसं म्हणता?
पाहा अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया–
26 जुलै 2022 रोजी वेदांताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असंही लिहिलंय. जर महाविकास आघाडी सरकारच्या काळातच प्रकल्प पूर्ण गेला होता तर मग ही बैठक कशासाठी केली?
म्हणून सरकारच्या वतीने केले जाणारे आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.