शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी सुरु- दिलीप वळसे पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. 4 तारखेला इंटेलिजन्स विभागाने पोलिसांना पत्रं लिहून इशारा दिला होता. हे खरं आहे. तरीही चूक राहिली. पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित डीसीपीची बदली केली आहे. गावदेवीच्या निरीक्षकाला निलंबित केलं आहे. चौकशी सुरू आहे. आणखी चौकशीत जे पुढे येईल त्यानुसार कारवाई करू, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
Latest Videos