रोहित पवार ईडी कार्यालयात; ED चौकशीला जाण्यापूर्वी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा
ईडी कार्यालयात दाखल होताच रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्यांनी जी कागदपत्र मागितली आहे. सर्व कागदपत्र घेऊन मी ईडी कार्यालयात दाखल झालो आहे.
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. याकरता रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. ईडी कार्यालयात दाखल होताच रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्यांनी जी कागदपत्र मागितली आहे. सर्व कागदपत्र घेऊन मी ईडी कार्यालयात दाखल झालो आहे. यापूर्वीही मी हवी ती कागदपत्र दिली आहेत. तर ईडीने मागवलेली सर्व माहिती मी स्वतः देणार असल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी ईडी चौकशीला हजर होण्यापूर्वी म्हटले आहे. तर पळणार नाही तर जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करणार, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत मागवलेली माहिती सर्व माहिती मी तपास यंत्रणांना दिलेली आहे. चूक केली नसेल तर घाबरायचं कारण नाही. या कार्यालयातून परत आल्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यास आम्ही तयार असू, असेही स्पष्ट रोहित पवार यांनी म्हटलं आहे.