मुंबईत एका जागेवर मनसे ‘इंजिन’ चिन्हावर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची मनसेसोबत बोलणी
मुंबईत एका जागेवर मनसेला लढण्याचा आग्रह आहे आणि त्यासाठी राज ठाकरे मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हावरच लढण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. जागा वाटप आपल्याला जमणार नाही, असे राज ठाकरे गुढीपाडव्या मेळाव्यात म्हणाले. मुंबईत मनसे एक जागा लढवण्यास इच्छुक?
मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केलं. पण आता पुन्हा महायुतीकडून राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत एका जागेवर मनसेला लढण्याचा आग्रह आहे आणि त्यासाठी राज ठाकरे मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हावरच लढण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. जागा वाटप आपल्याला जमणार नाही, असे राज ठाकरे गुढीपाडव्या मेळाव्यात म्हणाले. मुंबईत मनसे एक जागा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात मनसे अजूनही आशावादी आहे. मात्र रेल्वे चिन्हावर लढण्यावरच राज ठाकरे ठाम आहेत. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकरांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतायतं. इतकंच नाहीतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना नांदगावकरांनी दिल्यात. मात्र दक्षिण मुंबई लोकसभेबाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजपकडून नार्वेकर, लोढा आणि शिंदे गटाकडून देवरा, यशवंत जाधवांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे यांच्यात मनसेचा उमेदवार उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.