जरांगे पाटील आरक्षणावर ठाम, आजचा मुक्काम मुंबईतच! …नाही तर आझाद मैदानावर जाणार
26 जानेवारीचा मान ठेवून मुंबईतील आझाद मैदानावर जात नाही, इथंच थांबतो, मात्र माघारी फिरत नाही. वाटल्यास आजची रात्र इथंच थांबतो
Maratha reservation: 26 जानेवारीचा मान ठेवून मुंबईतील आझाद मैदानावर जात नाही, इथंच थांबतो, मात्र माघारी फिरत नाही. वाटल्यास आजची रात्र इथंच थांबतो. आम्हाला आजच तुम्ही रात्री अध्यादेश द्या. नाहीतर आम्ही सर्व मराठा बांधव आझाद मैदानावर जाणार. आजचा मुक्काम वाशीमध्येच करणार. सगेसोयऱ्यांबाबतचा अध्यादेश आजच रात्री द्यावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी काय?
सग्यासोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहू शकत नाही. राहिला तर तुम्ही माझ्याकडे या. पुन्हा ताकदीनं आंदोलन उभं करेन. पण एकही मराठा वंचित ठेवणार नाही. या ५४ लाख नोंदीचा डेटा हवा.
सग्यासोऱ्याचा आदेशच काढला नाही. चिवटेंना विनंती आहे. तुम्ही प्रयत्न केला. आम्ही त्यासाठीच इथे आलो. आम्हाला हौस नाही. आम्ही कष्टकरी लोक आहोत. आमची इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्रीच हा अध्यादेश द्यावा.