लोकसभेऐवजी विधानसभेला एकत्र येणार? महायुतीत मनसेच्या सहभागावर कुठं अडलं?
राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन २४ तास उलटले. मात्र राज ठाकरे मुंबईत येऊनही महायुतीत सहभागी होण्यावरून हालचाली झालेल्या नाहीत. अशातच एकदोन दिवस वाट बघा नंतर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई, २१ मार्च २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेही महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा जोर धरू लागल्या. पण या भेटीनंतर मनसेची भाजपसोबत काही बैठक झालेली नाही. त्यामुळे नेमकं कुठं अडलंय यावरून चर्चा सुरू झालीये. राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन २४ तास उलटले. मात्र राज ठाकरे मुंबईत येऊनही महायुतीत सहभागी होण्यावरून हालचाली झालेल्या नाहीत. अशातच एकदोन दिवस वाट बघा नंतर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेऐवजी मनसे विधानसभेला महायुतीत एकत्र येण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंना लोकसभेत जागा देण्याऐवजी राज्यसभेचा पर्याय देण्याची शक्यता आहे. विधानसभेवरूनही अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. विधानसभेवरूनही अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. मनसेने लोकसभेला प्रचारात मदत करावी, विधानसभेत विचार करू अशी चर्चाही दोघांत झाल्याचं कळतंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट