‘वारंवार अपमान होतोय, आता तरी विचार करा’, राष्ट्रवादीच्या नेत्याने दादांना डिवचलं
अजितदादा नाराज होते, मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले नाहीत. पण, पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले आणि ते सक्रिय झाले. मंत्रालयात सुद्धा बैठकीला हजर झाले. पण, याचा आता दादांनी विचार करावा असा टोला मंजी मंत्री अनिल देशमुख यांनी लगावला.
गडचिरोली : 5 ऑक्टोबर 2023 | शरद पवार गटातील नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालक मंत्रीपदावरून दादांना सल्ला दिला आहे. अनिल देशमुख हे गडचिरोली दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दादांना टोलाही लगावला. अजित पवार नाराज होते. त्यांनी कोणत्याही बैठकांना हजेरी लावली नाही, असे ऐकायला मिळाले. परंतु, पुण्याचे पालकमंत्री पद दादांना मिळताच ते सक्रिय झाले. मंत्रालयात सुद्धा बैठकीला हजर झाले. मात्र, भाजपचे मोठे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्री पद काढून त्यांचे खच्चीकरण केले. भाजपमधले मोठे नेते असतानाही त्यांना अतिशय लहान खात्याचे मंत्री बनवण्यात आले. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाचे आमदार असतानाही त्यांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपमानाचा चंद्रकांत दादा पाटील यांनी विचार करावा, असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिला.