Eknath Khadse यांनी काय केलं मोठं वक्तव्य? सून अन् सासऱ्यामध्ये रावेरच्या जागेवरून सामना रंगणार?
VIDEO | जळगावातील रावेर लोकसभेच्या जागेवरून पक्षांतर्गत आणि विविध पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू, एकनाथ खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरण्यास तयार? काय केलं एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य? बघा व्हिडीओ
जळगाव, १३ सप्टेंबर २०२३ | ‘पक्षाचा जर आदेश आला तर मी लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी तयार आहे. इंडियाच्या माध्यमातून रावेर लोकसभेची जागा आली आणि पक्षाने मला जर आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवणार’, असे राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रावेर लोकसभा क्षेत्र अनेक वर्षापासून काँग्रेस हे लढत आहे. 1990 पासून तर आतापर्यंत काँग्रेस रावेर लोकसभा जागा लढवत आहे. जवळपास दहा निवडणुका झाल्यात काँग्रेस ही जागा लढवत आहे. एक निवडणूक तेरा महिन्याची सोडली तर या ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही. कार्यकर्त्यांचं असं मत आहे, 9 वेळा ही जागा काँग्रेस हरली असेल राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी द्यावा शेवटी इंडियाच्या माध्यमातून जो निर्णय होईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल, प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.
Published on: Sep 13, 2023 06:39 PM
Latest Videos