थोडं डोळे मिटून आत्मचिंतन करावं, उदय सामंत यांनी कुणाला दिला सल्ला?
VIDEO | महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची 'टीव्ही 9 मराठी'च्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' या विशेष कार्यक्रमात मुलाखत
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने घेरण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटातील आमदारांना गद्दार, बंडखोर म्हणून बोलले जात असल्याचे माध्यमातून दिसतेय यावर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विशेष कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधीवर त्यांनी भाष्य केले. गद्दार गद्दार म्हणण्यापेक्षा आणि तसे शब्दप्रयोग करण्यापेक्षा कधीतरी डोळे मिटून आत्मचिंतन करणं गरजेचं असल्याचा सल्ला उदय सामंत यांनी विरोधकांना दिला आहे. शिंदे गट आणि शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या टीकेवर मी जात नाही पण आम्ही घेतलेला निर्णय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या आधारावर घेतलेला निर्णय होता, असेही उदय सामंत यांनी सांगितले.