Nagpur : 15 वैदू कुटुंबांना गावाबाहेर काढण्याचा डाव, ग्रामपंचायतीचा ठराव, प्रशासन काय करतंय?
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा येथे वैदू समाजातील 75 जणांना गावाबाहेर काढण्याचा डाव असल्याचा प्रकार समोर आलाय.
नागपूर : नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैदू समाजातील (vaidu samaj) 15 कुटुंबातील 75 जणांना गावाबाहेर काढण्याचा डाव असल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील (Mauda Taluka) नरसाळा येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यासाठी नरसाळ येथील ग्रामपंचायतीनं ठराव पारीत केला आहे. दुसऱ्या जातीचे (Caste) आणि राहणीमान नीट नसल्यानं गावाबाहेर काढण्याचा डाव असल्याचं समोर आलंय. यामुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार घडत असताना प्रशासन गप्प का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक नरसाळा येथे राहतात. गावोगावी भटकंती करुन जडीबुटी विकणारा वैदू समाजाच्या 75 जणांना गावाबाहेर काढण्याचा डाव असल्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. या वैदू समाजाचे ना राशन कार्ड आहे ना त्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण दिलं जातंय. या प्रकाराची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.