कोहली अन् गंभीर यांच्यात जोरदार जुंपली, दोघांमधील बाचाबाचीचं कारण नक्की काय?
VIDEO | विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्ये लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर कडाक्याचा वाद, दोघांनाही बसला मानधन कपातीचा मोठा फटका
मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्ये लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर जोरदार वाद झाला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काल रात्री लखनौच्या मैदानात वाजल्याचं समोर आलं. आरसीबी आणि लखनौ सामना संपल्यानंतर या दोघांमध्ये हा वाद झाला. तर हा वाद आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 127 धावांचं आव्हान लखनऊला पेलता आलं नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये 108 गुंडाळल्याचे दिसले. आरसीबीने यासह लखनऊचा 18 धावांनी मात करत मागील पराभवाचा वचपा घेतल्याचे समोर आले. तर या दोघांचा वाद मैदानातील उपस्थित असलेल्या खेळाडूंनी हस्तक्षेप करत सोडवला दरम्यान, कोहली आणि गंभीर दोघेही IPL च्या आचार संहिता उल्लंघनात दोषी ठरले असल्याचे सांगितले गेले. आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या दोघांनाही 100 टक्के मानधन कपातीचा दंड बसला आहे. तर यांच्या दोघांमधील राड्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.