Special Report | Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्यात पुन्हा जवळीक?

Special Report | Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्यात पुन्हा जवळीक?

| Updated on: Mar 06, 2022 | 9:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी त्यांच्याच बराच वेळ गुजगोष्टी रंगल्या. त्यांच्या या मैफलीची खुसखुशीत चर्चा सुरू झाली. बघा एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून कार्यक्रमात भाग घेतला. दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत रोषही व्यक्त केला. हे फक्त आणि फक्त ‘राष्ट्रवादी’लाच जमू शकते, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली. त्याला अनेक मागचे आणि पुढचेही संदर्भ होते. हे सांगायला कोण्या जाणत्या तज्ज्ञांची गरज नसावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात मेट्रोच्या उदघाटनापासून ते अनेक कार्यक्रमांचा धडाका लावला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र, या दौऱ्यात व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांच्या गुजगोष्टी रंगल्या आणि अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Published on: Mar 06, 2022 08:45 PM