Special Report | पंकजा मुंडे – देवेंद्र फडणवीसांमधल्या कलहाला पूर्णविराम?
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी चक्क फडणवीसांचं भरसभेत कौतुक केलं आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी चक्क फडणवीसांचं भरसभेत कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा आहे, अशा शब्दात पंकजा यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. आष्टीत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या संयमाचं कौतुक केलं. काही लोक फडणवीसांकडे जागा वाटपासाठी गेले होते. 50-50 टक्के जागा मागत होते. त्यावेळी फडणवीसांनी संयम दाखवला. त्यांच्याकडून संयम शिकण्यासारखा आहे. त्यानंतर त्यांना मी एक फॉर्म्युला दिला. मी म्हटले 50 टक्के जागा दिल्या तर समोरच्याच विजय होत असतो. एकाला आष्टीत आणि दुसऱ्याला पाटोद्यात उभं करा. शिरुरमध्येही युती करा, असं मी सूचवलं होतं, असं पंकजा म्हणाल्या.