Israel-Palestine War : इस्त्रायलवर 5 हजार रॉकेटमार्फत हल्ला, इस्रायलनेही पॅलेस्टाईन विरोधात केली युद्धाची घोषणा
VIDEO | गाजा येथील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले, पॅलेस्टाईनकडून झालेल्या या कृत्यामुळे चवताळलेल्या इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली. इस्रायलच्या भूमीत मोठ्या संख्येने दहशतवादी शिरल्याने इस्रायलकडून देखील या हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आले आहे.
जेरूस्लेम, ७ ऑक्टोबर २०२३ | इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झालं आहे. पॅलेस्टाईनकडून इस्त्रायलवर 5 हजार रॉकेटमार्फत हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर आणि सीमेच्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलकडून देखील युद्धाची घोषणा केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर इस्रायलमधील नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. इस्रायलच्या भूमीत मोठ्या संख्येने दहशतवादी शिरल्याने इस्रायलकडून देखील या हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासून गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ले करण्यात येत आहे. युद्धाची घोषणा होताच अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. तर हमासने खासकरून दक्षिण आणि मध्य इस्रायलवर निशाणा साधला आहे. त्यांनी दक्षिण परिसरातील सैन्य कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.