वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण
महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात उघडकीस आली आहे.
पिंपरी चिंचवड : महिलेला मधलं बोट (Middle Finger) दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर आयटी इंजिनिअर तरुणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याने चोप दिला. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले.
Latest Videos