पटोलेंसोबत काम अशक्य, थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र; जाणून घ्या मोठ्या अपडेट्स
बाळासाहेब थोरात यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, तर काँग्रेस अंतर्गत राजकारणावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य
मुंबई : नाना पटोले यांच्यासोबत कम करणं अशक्य, तर अशाच प्रकारे सुरु राहिले तर दोन गट पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसमध्ये भरपूर लोकशाही हीच अडचण आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत राजकारणावर वक्तव्य केले आहे.
कसबा पेठमध्ये आज भाजप आणि काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तर दगडू शेठ बाप्पाच्या दर्शनानंतर भाजपचे हेमंत रासणे उमेदवारी अर्ज भरणार आहे. यासह काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आज अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वीच गाठी भेटी घेत अश्विनी जगताप यांचा प्रचार सुरू झाला आहे. तर चिंचवड पोट निवडणुकीची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. पुण्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरी डीनर डिप्लोमसी झाल्याचे पाहायला मिळाले असून त्यांच्या घरी नाना पटोले, अशोक चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली.