Chandrakant Patil LIVE | जलयुक्त शिवारमुळे पूर आला, हा दावा हस्यास्पद : चंद्रकांत पाटील
मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे (jalyukta shivar yojana) बोट दाखवत आहेत.
पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे (jalyukta shivar yojana) बोट दाखवत आहेत.
जलयुक्त शिवाराच्या कामात मोठ्या प्रमाणात नद्यांशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. जलयुक्त शिवार यांच्या कामाची चौकशीची मागणी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली आहे.