IT Raid | आयकर विभागाची 5 साखर कारखान्यांवर धाड, जरंडेश्वर कारखान्याचाही समावेश
पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारु सुरु आहे
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.