Pune | अजित पवार यांच्या दौंड साखर कारखान्यावर IT ची धाड

| Updated on: Oct 07, 2021 | 8:33 PM

दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागानं कारवाई केलेले साखर कारखाने हे अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे असल्याची माहिती आहे.

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागानं मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागानं राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागानं कारवाई केलेले साखर कारखाने हे अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे असल्याची माहिती आहे.