पुण्याहून आता महाबळेश्वरला जाणं होणार अधिक सोयिस्कर, कोणता आहे नवा पर्याय?

पुण्याहून आता महाबळेश्वरला जाणं होणार अधिक सोयिस्कर, कोणता आहे नवा पर्याय?

| Updated on: Jun 07, 2023 | 2:28 PM

VIDEO | कापूरहोळ ते वाई रस्ता रुंदीकरणाला सुरुवात, महाबळेश्वरला जाणं होणार सुकर

पुणे : पुण्याहून भोर – वाईमार्गे महाबळेश्वरला जाण आता आणखीण सुकर होणार आहे. पुणे सतारा महामार्गवरील मार्गावरील कापूरहोळ फाटा ते वाई या 54 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात आता सुरुवात करण्यात आली आहे. रुंदीकरणाबरोबरच या मार्गावरची वळणे आणि चढ उतार कमी केले जाणार आहेत. यासाठी या मार्गावर 102 नव्या मोऱ्या बांधण्यात येणार आहेत. रस्त्याच्या कामासाठी या मार्गावरची 934 झाडं कापायला सुरुवात करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यावर नवीन झाडं लावण्यात येणारं असली तरी मात्र यासाठी 100 ते 150 वर्षांपूर्वीची जुनी झाडं कापली जात असल्यानं पर्यावरण प्रेमींच्यात याची खंत पाहायला मिळतीय. रस्त्याच्या एकूण कामासाठी 340 कोटींचा निधी मंजूर झालाय. रस्ता झाल्यानं या मार्गावरील पर्यटनाचा विकास होणार असल्यानं, त्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारं आहेत.

Published on: Jun 07, 2023 02:28 PM