Breaking | मुंबई रिव्हर अँथमधून जयदीप राणाचं नाव वगळलं, मंत्री नवाब मलिकांचं ट्वीट

Breaking | मुंबई रिव्हर अँथमधून जयदीप राणाचं नाव वगळलं, मंत्री नवाब मलिकांचं ट्वीट

| Updated on: Nov 01, 2021 | 5:14 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची फुलझडी लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची फुलझडी लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव मुंबई रिव्हर अँथममधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मलिकांनी केला होता. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहेत, असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.