Jaisalmer Water News : लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?

Jaisalmer Water News : लुप्त ‘सरस्वती’ पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 02, 2025 | 11:41 AM

विक्रमशेट भाटी यांनी आपल्या घराजवळ बोअर कऱण्याचं ठरवलं. साधारण साडे आठशे फुटापर्यंत बोअर झाली तोपर्यंत सारं काही ठीक पण...

जैसलमेरमध्ये शेतीच्या पाण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या शेतात बोअरिंग केली आणि संपूर्ण गावात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात समुद्रांच्या लाटांप्रमाणे उसळणारा हा जलप्रपात कसा आणि कुठून आला? यासंबंधित अनेक तज्ज्ञ कोड्यात पडलेत. सोशल मीडियावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काहींच्या मते हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात लुप्त झालेली सरस्वती नदी ही पुन्हा पृथ्वीवर अवतरली आहे. मात्र तब्बल दोन दिवस चाललेल्या या पाण्याच्या प्रवाहाने भूगर्भ अभ्यासकांना देखील बुचकळ्यात टाकलंय. राजस्थानच्या जैसलमेरमधील मोहनगड भागात ही घटना घडली. वाळवंट भागातील हा परिसर असला तरी काही भागात इथे जलस्त्रोत सापडतात. त्यामुळे विक्रमशेट भाटी यांनी आपल्या घराजवळ बोअर कऱण्याचं ठरवलं. साधारण साडे आठशे फुटापर्यंत बोअर झाली तोपर्यंत सारं काही ठीक पण जमीन फाटावी इतक्या प्रचंड दाबाने पाणी बाहेर आला. यावेळी पाण्याचा प्रवाह इतका होता की पन्नास फुटाचं बोअर मशिन देखील खड्ड्यात गाडलं गेलं. बघा व्हिडीओ नेमकं काय घडलं?

Published on: Jan 02, 2025 11:41 AM