Palghar Blast | तारापूर MIDC मधील जखारिया लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये भीषण स्फोट
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट जे-१ मध्ये कापडाचं उत्पादन करणाऱ्या जखारिया कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झालाय तर अन्य पाच कामगार जखमी झाले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट जे-१ मध्ये कापडाचं उत्पादन करणाऱ्या जखारिया कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झालाय तर अन्य पाच कामगार जखमी झाले आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झालाय. तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज आला. त्यानंतर कंपनीमध्ये मोठी आग लागली. तारापूर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल असून आग नियंत्रणात आली आहे.
Latest Videos