जालन्यात देवेंद्र फडणवीस मैदानात; पाणी प्रश्नासाठी जलआक्रोश मोर्चा
औरंगाबादनंतर जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
औरंगाबादनंतर जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सत्तेखालील नगरपालिकेने अनेक वर्षांपासून शहरातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे. शहरातील प्रमुख दोन जलाशयांमध्ये अनेक भागांत दहा ते पंधरा दिवसाआड पाणी येतं. मात्र शहरवासियांना किमान आठ दिवसातून दोनदा पाणी मिळावं, या मागणीसाठी भाजपतर्फे हा जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातील या मोर्चाची जय्यत तयारी भाजपतर्फे कऱण्यात आली होता. आज देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपातर्फे हा मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातल्या मामा चौकात यानिमित्त आज सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. सकाळी 11 वाजेनंतर शेकडो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.