गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, मराठा तरुण झाले आक्रमक
जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी बीड येथील मराठा समाजाच्या तरुणांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलय. या तरुणांनी मनोज जवांगे यांच्या आंदोलनांला पाठींबा दिला.
बीड : 3 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही प्रमुख मागणी घेऊन जालना येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. मात्र, पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. जालनामध्ये मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मनोज जवांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालना बीड जिल्ह्याच्या सीमेवरील गुळज येथील गोदावरी नदीपात्रात मराठा तरुणांनी जलसमाधी आंदोलन केले. गोदावरी नदी पात्रामध्ये हे तरुण उतरले आहेत. तर या आंदोलनादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. NDRF ची टीम नदी पात्रात तैनात करण्यात आली आहे.
Published on: Sep 03, 2023 06:58 PM