Santosh Deshmukh Case : मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपी, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची आहे. यासह पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावर कारवाई करा, अशीही मागणी गावकऱ्यांची आहे.
बीडच्या केड तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपी, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची आहे. यासह पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावर कारवाई करा, अशीही मागणी गावकऱ्यांची आहे. बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २२ दिवस उलटले आहेत. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने मस्साजोगचं वातावरण तापलं आहे. दरम्यान, याप्रकरणाचा पोलीस तपास वेगाने सुरु असताना मस्साजोगमधील गावकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती बिघडल्याचे ही समोर आले. सकाळीच ग्रामस्थांनी मस्साजोग शिवारात उतरुन सामूहिक जल समाधी आंदोलन केले. या आंदोलनात गावातील महिला, लहान मुलंही सहभाग होता.