Maratha Protest : आरक्षण मिळावं म्हणून जलसमाधी आंदोलन, मराठा आंदोलक कुठं उतरले थेट पाण्यात?

Maratha Protest : आरक्षण मिळावं म्हणून जलसमाधी आंदोलन, मराठा आंदोलक कुठं उतरले थेट पाण्यात?

| Updated on: Oct 30, 2023 | 4:37 PM

VIDEO | वारंवार मनोज जरांगे पाटलांकडून देखील शांततेचे आवाहन केले जात असताना काही ठिकाणी आक्रमक पाऊल कार्यकर्ते उचलताना दिसताय. पुण्यातील मावळमध्ये मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळमध्ये ठिकठिकाणी उपोषण सुरु

मावळ, पुणे, ३० ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल असून राज्यात शांतता राखण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आहे. वारंवार मनोज जरांगे पाटलांकडून देखील शांततेचे आवाहन केले जात असताना काही ठिकाणी आक्रमक पाऊल कार्यकर्ते उचलताना दिसताय. पुण्यातील मावळमध्ये मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळमध्ये ठिकठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. कार्ला येथील आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत थेट पाण्यात उडी मारून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. तर जोपर्यंत मराठा समाजाला मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी आक्रमक आंदोलकांकडून राज्य सरकारचा धिक्कार करून निषेध नोंदविण्यात आला आहे.

Published on: Oct 30, 2023 04:37 PM