Video : ‘मुंडेसाहेब असते तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपण बदलला असता’, खडसेंचा टोला फडणवीसांना?

| Updated on: May 08, 2022 | 10:49 AM

आता राज्यात जी राजकीय स्थिती आहे, तशी स्थिती गोपीनाथ मुंडे असते, तर नसती, असंही ते म्हणालेत.

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या नावाचा उल्लेख करत विरोधकांवर बोचरी टीका केली. गोपीनाथ मुंडे जर आज असते, तर त्यांनी मुख्यमंत्रीपण बदलला असता, असं म्हणत विरोधकांना टोला हाणलाय. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता एकनाथ खडसेंनी सूचक विधान केलंय. ते जळगावातील एका कार्यक्रमात बोलत होते. आता राज्यात जी राजकीय स्थिती आहे, तशी स्थिती गोपीनाथ मुंडे असते, तर नसती, असंही ते म्हणालेत. यावेळी धनंजय मुंडे यांना उद्देशून खडसेंनी मोलाचा सल्लाही दिलाय. मुंडेसाहेबांच्या शिकवणीत धनंजय मुंडेंसारखा कार्यकर्ता तयार झाला. धनंजय मुंडे यांनीही मुंडेसाहेबांची शिकवणूक पुढे घेऊन जावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात मु्ंडे साहेब असते, तर महाराष्ट्राची आणखी भरभराट झाली असती, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

 

Pune Vasant More On Hanuman Mahaarti | कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर; वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली
राष्ट्रपती Ram Nath Kovind यांच्या हस्ते IIM नागपूर कॅम्पसचं उद्घाटन