तुम्ही कधी पुस्तकांचा बगीचा पाहिलाय? ‘या’ जिल्ह्यात साकारलाय अनोखा बगीचा, पण का?
वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी जळगावातील एरंडोल येथे साकारलेला प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग असून हा बगीचा राज्यातला पुस्तकांचा एकमेव बगीचा ठरला आहे. वाचन संस्कृती टिकून राहावी या हेतून साकारला बगीचा
जळगाव, ३ नोव्हेंबर २०२३ | तुम्ही झाडा-झुडपांचे बगीचे पाहिले असतील किंवा फुलांचे बगीचे देखील पाहिले असतील. मात्र पुस्तकांचा बगीचा तुम्ही पाहिलाय का? जळगावातील एरंडोल नगरपरिषदेने तब्बल एकर जागेवर चक्क पुस्तकांचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार असून एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग असून हा बगीचा राज्यातला पुस्तकांचा एकमेव बगीचा ठरला आहे. एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या बागेमध्ये कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे असे एकूण एक हजारांपेक्षा जास्त पुस्तक येथे उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंट ही तयार करण्यात आला आहे.