Gulabrao Patil : मी गिरीश महाजन यांच्यापेक्षा मोठा आमदार पण..., गुलाबराव पाटील यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Gulabrao Patil : मी गिरीश महाजन यांच्यापेक्षा मोठा आमदार पण…, गुलाबराव पाटील यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

| Updated on: Oct 16, 2023 | 12:53 PM

VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल केलं सूचक वक्तव्य, म्हणाले, मी गिरीश महाजनांपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील, याचं मला काय देणं-घेणं नाही.

जळगाव, १६ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात चांगलीच स्पर्धा सुरू असताना तिन्ही पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मी गिरीश महाजन यांच्यापेक्षा मोठा आमदार, पण त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात, या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकताच एक कार्यक्रम पार पडला. यावेळी गुलाबराव पाटील विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी केली. मी गिरीश महाजनांपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील, याचं मला काय देणं-घेणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती मिळतात. पण मी ज्या मतदारसंघात राहतो, मतदारसंघाचा मी आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांचे दोन फॅक्टऱ्या आहेत. केशव प्रतिष्ठानही त्याच मतदारसंघात आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Published on: Oct 16, 2023 12:53 PM