पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हालाही पडणार महागात
पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगावातील चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील आठवडे बाजारातील हा धक्कादायक प्रकार आहे. तर पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80 जणांना विषबाधा झालेल्यांवर चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाणीपुरी पाहिली तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं…. मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जळगावामध्ये पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगावातील चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील आठवडे बाजारातील हा धक्कादायक प्रकार आहे. तर पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80 जणांना विषबाधा झालेल्यांवर चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. विषबाधा झालेल्या या 80 जणांमध्ये लहान मुलांदेखील समावेश आहे. पाणी खाल्यानंतर विषबाधा झाल्याच्या प्रकारानंतर एकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 80 जणांना विषबाधा झालेले चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव येथील रुग्ण असून पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास झाला. त्यांच्यावर नजीकच्या अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.