‘एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील…’, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
सध्या राज्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांची चांगलीच चर्चा आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी भाष्य करत पूर्णविराम दिला आहे. अशातच मुक्ताईनगरच्या आमदारानं जिव्हारी लागणारी टीका एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.
एकनाथ खडसे घाबरलेले आहेत, त्यांना उपचारांची गरज आहे, अशी टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तर एकनाथ खडसे हे विसर्जित करतील की विसर्जित होतील हे जनता ठरवेल, असं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं असून त्यांनी एकनाथ खडसे यांना फटकारलं आहे. ‘एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील बदनाम ठेलेवाला माणूस आहे. त्याच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. त्यामुळे एकनाथ खडसे बदनाम गल्लीत बसलेला बदनाम ठेला घेऊन बसलेला संस्कारी भाषा करणारा माणूस आहे, त्याच्याकडून दुसऱ्या अपेक्षा करू शकत नाही.’, असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले की, ‘एकनाथ खडसे हा घाबरलेला माणूस आहे. त्यांना फोबिया झाला आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे विसर्जित करतील की विसर्जित होतील हे जनता ठरवेल’, असे वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे.