रिक्षा चालकाच्या मुलीचा नेव्हीचा थाट तर पाहा? कुठली आहे ही तरूणी जिचं होतंय सर्वत्र कौतुक
VIDEO | हलाखीच्या परिस्थितीत रिक्षा चालकानं मुलीला नेव्ही अधिकारी बनवून उंच शिखरापर्यंत पोहोचवलं, बघा तिची जिद्द!
जळगाव : बोदवड तालुक्यातील चिखली येथील एका गाव खेड्यातील रिक्षा चालकाच्या मुलीने थेट नेव्ही अधिकारी होण्यापर्यंत जिद्द पूर्ण केल्यानं तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या मुलीचे नाव वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील असे असून या विद्यार्थिनीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठले आणि थेट नेव्ही अधिकाऱ्यापर्यंत मजल मारली. त्यामुळे सर्वत्र या विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीचे वडील ज्ञानेश्वर पाटील हे घर सांभाळण्यासाठी रिक्षा चालवत आहेत. वैष्णवीचा हैदराबाद येथे नेव्हीची परिक्षेचा पेपर होता. त्यावेळी घरात एक रुपया सुध्दा नव्हता. शेवटी आई-वडिलांनी एलआयसी मनी बॅक पॉलिसीचे काढले. आई-वडिलांनी तात्काळ ते पैसे मुलीला विमानाच्या तिकिटासाठी देत नेव्हीच्या परीक्षेला पाठवले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वैष्णवीने आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.