लोक संजय राऊत यांच्याकडे फक्त…; गिरीश महाजन यांचं जोरदार टीकास्त्र
ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
जामनेर, जळगाव : सावरकर गौरव यात्रेनिमित्त जामनेर मध्ये भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोटरसायकल रॅलीत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन हे देखील सहभागी झाले होते. गिरीश महाजन यांनी बुलेट चालवत या सुमारे 5 किमी रॅलीत सहभाग घेतला. तर शेकडोच्या संख्येने कार्यकर्तेही या मोटरसायकल रॅलीत सहभागी होऊन हातात भगवे झेंडे आणि सावरकरांचा जयघोष करत ही मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. लोक संजय राऊत यांच्याकडे करमणूक म्हणून आणि जोकर म्हणून बघतात, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना फडणवीस हे भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची टीका केली होती, या टीकेला गिरीश महाजन यांनी जळगावात जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Published on: Apr 06, 2023 04:05 PM
Latest Videos