वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं ‘या’ जिल्ह्याला झोडपलं, बळीराजा आर्थिक संकटात
VIDEO | राज्यात अवकाळी पावसाचा कहर, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या पावसानं लोकांची उडाली दाणादाण, बघा व्हिडीओ
जालना : राज्यभरात काही जिल्ह्यात अजून अवकाळी पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर, बुलढाणा आणि नाशिक या जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी संग्रामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसानं घातलेल्या थैमानामुळे अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घराची छपरे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली असून अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील आलापूर, पळसखेडा, मालखेडा यासह इतर भागात वादळी वारे आणि गारांचा पाऊस झाला. या पावसानं मका, कांदा, बाजरी यासह या भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील तुरळक पाऊस झाला आहे. दरम्यान, गारांच्या पावसानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जाव लागतय.