सुरक्षादलांना मोठं यश, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 4 अतिरेक्यांना जम्मू काश्मीर पोलिसांकडून अटक

सुरक्षादलांना मोठं यश, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 4 अतिरेक्यांना जम्मू काश्मीर पोलिसांकडून अटक

| Updated on: Aug 14, 2021 | 3:03 PM

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनी मोटारसायकल आयईडी स्फोट घडवून आणण्याच्या मोठा कट या दहशतवाद्यांचा होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे सत्यात उतरू शकले नाहीत. लिसांनी सुरुवातीला मुंतजिर मंजूर या दहशतवाद्याला अटक केलीय. मुंतजिर हा पुलवामाचा राहणारा आणि जैशचा दहशतवादी आहे. मुंतजिरकडून पोलिसांनी एक पिस्तूल, एक मॅक्झीन, 8 राऊंड काडतूस आणि दोन चीनी हॅन्डग्रेनेड जप्त केलेत. तो एका ट्रकच्या सहाय्यानं शस्त्रास्त्र पुरवण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी तो ट्रकही जप्त केला आहे.