Sanjay Lele Death In Pahalgam : पहलगामच्या हल्ल्यात डोंबिवलीच्या संजय लेलेंचा दुर्दैवी मृत्यू, लेले कुटुंब काश्मीरकडे रवाना
Dead In Terror Attack in Pahalgam : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात महाराष्ट्रातून फिरायला गेलेल्या 6 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील तिघे हे डोंबिवली येथील रहिवासी आहेत.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मुंबईतील डोंबिवलीच्या संजय लेले यांचा मृत्यू झाला आहे. आता संजय लेले यांचं कुटुंब आता काश्मीरकडे रवाना झालं आहे.
संजय लेले हे जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते. काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. यात संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी हे आहेत. सध्या लेले यांचं कुटुंब हे काश्मीरकडे रवाना झालेलं आहे. या घटनेने डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे डोंबोवली मधील हे तिघे मावस भावंड आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजन माहिती समोर

जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी

मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
