Special Report | अॅसिड…खून…आणि गौप्यस्फोट !
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. राणेंच्या या आरोपांवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत यांनी राणेंवर गंभीर आरोप केलाय.
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. राणेंच्या या आरोपांवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत यांनी राणेंवर गंभीर आरोप केलाय. “ज्यावेळी नारायण राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणेसाऱख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकलं आणि जाळलं याची कधी विचारपूस केली आहे का तुम्ही? असं मला त्यांना विचारायचं आहे.”, असा आरोप त्यांनी केला.
Latest Videos