Jarandeshwar Sugar Mill | जरंडेश्वर साखर कारखाना सील, अजित पवार ईडीच्या रडारवर? नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
Latest Videos