Aurangabad Rain | औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्के भरलं, धरणातून पाण्याचा विसर्ग
एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada And Aurangabad) उत्साहचं वातावरण आहे.
औरंगाबाद: आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण (Jayakwadi dam, Aurangabad) यावर्षी तब्बल 95 टक्के भरलं आहे. एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असतं मात्र दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada And Aurangabad) उत्साहचं वातावरण आहे. असं म्हणतात की, हे धरण एकदा जर पूर्ण भरलं तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. यामुळे तर या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
Latest Videos