Jayakwadi Dam | जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 4 दरवाजे उघडले

Jayakwadi Dam | जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 4 दरवाजे उघडले

| Updated on: Sep 29, 2021 | 12:06 PM

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95%  झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95%  झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.