“ओबीसी नेत्याना त्रास देण्याचं काम भाजप करतेय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका

| Updated on: Jun 05, 2023 | 12:06 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये ओबीसी नेत्यांना गेल्या सहा-सात वर्षांपासून त्रास देण्याचे काम भाजपच्या वतीने सुरू आहे.

अहमदनगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये ओबीसी नेत्यांना गेल्या सहा-सात वर्षांपासून त्रास देण्याचे काम भाजपच्या वतीने सुरू आहे. ते ओबीसी नेते भाजपचे असो अथवा दुसऱ्या पक्षाच्या असो सर्व स्तरावर त्यांना त्रास दिला जातोय”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. “तर पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मला माहीत नसून त्यांचं संपूर्ण भाषण मी ऐकले नाही मात्र वृत्तपत्रात मी बातमी वाचली त्यांची मानसिक अवस्था काय आहे ? हे त्या बातमीतून लक्षात येते”, असा जयंत पाटील यांनी म्हटलंय. “त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून दुर्लक्ष होते असे वाटते तेव्हा त्यांनी सर्वांनी एकत्रित बसून हा प्रश्न सोडवायला पाहिजे”, असा सल्ला त्यांनी दिला आहे. “तसेच महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना वेगळ्या नजरेने पाहणं त्यांना संकटात टाकणं, त्यांना सर्व प्रकारे त्रास देणे, हे गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू आहे”, असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Published on: Jun 05, 2023 12:06 PM
“बालासोर रेल्वे अपघाताचा मोदी सरकार इव्हेंट करतंय”, संजय राऊत यांचा घणाघात
नाना पटोले यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरला राष्ट्रवादी नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाला, ”आकडे आणि निर्णय”