Maharashtra Budget 2024 : काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?

| Updated on: Jun 28, 2024 | 6:03 PM

काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अर्थमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अचानक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

Follow us on

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी दृश्य बघायला मिळाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. लिफ्टमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. तर आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी अर्थमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अचानक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज राज्याचा 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अजित पवार यांनी दहाव्यांदा बजेट विधीमंडळात सादर केले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधान भवनाच्या परिसरात अजित पवार आणि जयंत पाटील अचानक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नेमकी काय झाली चर्चा? बघा व्हिडीओ