Jayant Patil | अजित पवारांची CBI चौकशीचा ठराव, ही भाजपची वैचारिक दिवाळीखोरी : जयंत पाटील

Jayant Patil | अजित पवारांची CBI चौकशीचा ठराव, ही भाजपची वैचारिक दिवाळीखोरी : जयंत पाटील

| Updated on: Jun 24, 2021 | 9:15 PM

एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आणि तो मंजूरही करण्यात आलाय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवार जोरदार टीका केलीय. एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केलाय.

Published on: Jun 24, 2021 09:15 PM