Jayant Patil : मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील मजकूर सोशल मीडियावरील? काय म्हणाले जयंत पाटील?
VIDEO | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या 'मॅडम कमिश्नर' या पुस्तकाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकातील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्यासंबंधित चर्चा, यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
सांगली, १७ ऑक्टोबर, २०२३ | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलं आहे. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांच्याकडून हे गंभीर आरोप करण्यात आले आहे. मॅडम कमिशनर या पुस्तकात तत्कालीन मंत्री दादा असा उल्लेखही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मीरा बोरवणकर यांचं पुस्तक मी पाहिलेलं नाही. सोशल मीडियावरून माझ्याकडे आलेली माहिती त्यावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केल्याचे समजते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील मजकूर सोशल मीडियातून पाहिलं. त्यांच्या मागे सूत्रधार कोण आहे? असा सवाल करत याबाबत आपणाला काही माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले.