होऊ दे चर्चा… पवारांची साथ सोडत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी सोडलं मौन
पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटाचा बडा नेता आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यावर बोलताना जंयत पाटील यांनी मौन सोडलं आहे. ते म्हणाले, मी कुठेही जाणार नाही, मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही.
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे आयोगाने दिल्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. यानंतर शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसणार असल्याचं बोललं जात होतं. पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटाचा बडा नेता आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यावर बोलताना जंयत पाटील यांनी मौन सोडलं आहे. ते म्हणाले, कोणत्याही भाजपच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. किंवा मी त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. मी कुठेही जाणार नाही, मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. काय चर्चा होऊ दे…असे वक्तव्य करत जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या होत असलेल्या चर्चांवर स्पष्टच सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की, सारख्या अशा चर्चा बातम्या येण्याचे कारण काय? शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या काम करत आहे ते महाराष्ट्रात चांगलं असल्याचे त्यांनी म्हटले.